गाई-म्हशींचा स्तनदाह :

 

गाई-म्हशींचा स्तनदाह हा एक असा रोग आहे जो कि प्रायः अधिक दुध देणा-या जनावरांना भेडसावतो. या रोगामध्ये दुधाळ जनावरांचा ओवा / सड सुजतात आणि दुधात खराबी येते. कधी-कधी ओवा दुःखदायक होतो तसा तो गरम देखील जानवतो. स्तनदाह रोगास ग्रामिन भगात थन रोग किंवा दुधात खराबी येणे असे म्हणतात. अधिकतर हा रोग विभिन्न प्रकारच्या जीवाणुंद्वारा उद् भवतो जे कि जनावरांच्या सडांवर जमा होतात आणि ओव्यास झालेल्या इजा अथवा घाव यामध्ये किंवा सडांच्या छीद्रात पोहचतात व कासेमध्ये प्रवेश करतात यासाठी खाली दिलेल्या आकृतीचा अभ्यास करा.

 

या रोगाचे तीन प्रकार आढळतात :

१) लक्षण रहीत रोग- या रोगाचे निधान दूधाचे परिक्षण केल्यावरच होते कारण या प्रकारच्या बाधेत स्तन सुजत नाहित किंवा दुधात कोणतीही खराबी दीसत नाही. हा रोग जास्त

नुकसानदायक असतो.

२) लक्षण सहीत रोग- या रोगबाधेत ओव्याची सुज, दूध नासणे (फाटणे) व पुष्कळदा दूध अतिशय पातळ आणि पिवळे इत्यादि लक्षणे आढळतात.

३) जुनाट रोग- या रोगात जनावरांच्या ओव्यात रोगकारक जंतु दिर्घ काळ पर्यंत वास्तव्य करुन आपली संख्यात्मक वाढ करित असतात तथा दुध तयार करणा-या ग्रंथींचा नाश करतात. ओवा आकाराने लहान व कडक होतो.

 

औषधोपचार :

हा रोग समजल्या बरोवर पशु चिकित्सकाशी तात्काळ संपर्क करुन आजारी जनावरांचा लवकर उपचार करायला हवा अन्यथा या बाधेत दुध तयार करणा-या पेशींमधे खराबी येते आणि दूध निर्मिती थांबते.

 

रोगनियंत्रण :

१)       जनावरे आणि गोठे स्वच्छ ठेवा.

२)      जनावरांच्या सडाला इजा होवू दऊ नका.

३)      दूध काढण्यापूर्वी कास व सडांना स्वच्छ पाण्याने धुऊन काढा.

४)      दूध काढण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुऊन घ्या.

५)     ज्या सडात खराबी आहेत त्या सडाचे दुध शेवटी काढा व ते उपयोगात आणु नका.

६)      दूध काढल्यानंतर सड जिवाणु रोधक (अँन्टीसैपटीक) द्रावण (पोलीसान- डी , सोडीयम हाइपोक्लोराइड, अथवा क्लोरहैक्सीडीनच्या (सॅव्हलॉन) ०.५% द्रवणाने दररोज दूध दोहल्यानंतर

टीट- डीप करायला हवे.

७)     दूध दोहन पश्चात जनावर किमान अर्धा तास उभे राहिल याची दक्षता घ्या.

स्तनदाह या रोगावर नियंत्रण ठेवल्यास औषधोपचाराचा खर्च आणि पर्यायाने आर्थिक नुकसान वाचविता येईल.

 

जनावरांना होणारा तोंडाखुरी पायखुरी आजार

 

जनावरांमधील स्नोरिंग डिसिजआणि त्यावरील प्रतिबंधक उपाय

 

गुरांमधील गोचीड व त्यांचे नियंत्रण

 

जनावरांचे आजार व औषधी वनस्पती

 

करा लसीकरण होईल जनावरांचे प्राणसंरक्षण

 

जनावरांना होणाय्रा विषबाधा त्यावरील उपाय

 

जनावरांना जिवाणूमुळे होणारे रोग व त्यावरील उपाय

 

 

आधार : (घडीपत्रिका क्रमांक १९/२००४), महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.